भाजपला पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी शिवसेना लागली तयारीला
मुंबई
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेने आगामी मुंबई महापालिकेतही भाजपला चांगलाच धोबीपछाड देण्याचे ठरवले असून, त्यादृष्टीने आतापासूनच पक्ष महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वॉर्डमधील प्रलंबित कामांना कशी गती देता येईल, नगरसेवकांना सोयीसुविधांसाठी अधिकाधिक निधी कसा देता येईल, राज्य सरकारच्या प्रशासनाकडून मुंबई महापालिकेत रेंगाळणारे प्रकल्प कसे मार्गी लागता येईल, यासाठीचे पद्धतशीर नियोजन करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे.

No comments
Post a Comment