मुख्यमंत्री ठाकरेंनी सिनेसृष्टी हलवण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर योगींची प्रतिक्रिया
मुंबई -
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौरा करत राज्य सरकार युपीमध्ये जागतिक दर्जाची सिनेसृष्टी उभारणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु होती. अशातच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी आज याबाबत अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेनेने केलेल्या आरोपांवर देखील प्रतिक्रिया दिली.यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यातील व्यवसाय दुसऱ्या राज्यात घेऊन जाऊ देणार नाही या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी आम्ही येथून काहीही घेऊन जाणार नाही. मुंबईतील सिनेसृष्टी मुंबईमध्ये काम करेल, तर उत्तर प्रदेशात उभारण्यात येणारी सिनेसृष्टी ही नव्या गरजांनुसार उभारण्यात येणार आहे.' असे उत्तर दिले .

No comments
Post a Comment