केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी: यात्रा जत्रांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही
मुंबई
सध्या केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी आहे. मात्र यात्रा, जत्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अजून देखील परवानगी दिलेली नाही. त्याप्रमाणे म्हसवड येथील सिद्धनाथ व देवी जोगेश्वरी देवस्थानचा रथ उत्सवास परवानगी देण्यात येणार नाही. यापुढील काळात होणाऱ्या जिल्ह्यातील यात्रा व उत्सवांना प्रशासनाची परवानगी मिळणार नसल्याचं आता समोर आलं आहे. करोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाउन शिथिल करताना केवळ मंदिरे उघडण्यास काही अटी-शर्तींवर परवानगी दिलेली आहे. परंतु यात्रा, जत्रा, उत्सव व उरुसास जिल्ह्यात परवानगी दिलेली नाही. यातूनही कोणी यात्रेच्या ठिकाणी येत असतील व त्यातून गर्दी होणार असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.

No comments
Post a Comment