रावसाहेब दानवेंना घरात घुसून फाटकावले पाहिजे: बच्चू कडू
मुंबई
रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. तसंच, त्यांना घरात घुसून फटकवायला हवे असेही कडू म्हणाले. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल शेतकरी आंदोलन आता व्यापक स्वरूप प्राप्त करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, या आंदोलनामागे विरोधकांचा हात असल्याचे अनेकदा आरोप केले आहेत. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र या आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केले. सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली. गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले होते, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपले पाहिजे असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. सध्या सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. आधी देशातील मुस्लीम समाजाला उचकवल आणि सांगितले सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावे लागेल पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? त्यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाच षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे.

No comments
Post a Comment