Breaking News

1/breakingnews/recent

28 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

 News24सह्याद्री - चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही – फडणवीस...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES

1. देशात उत्पादित वस्तूच वापरण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन  
आता उत्पादक आणि उद्योजकांनी जागतिक दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करावे.’’ सरते वर्ष आत्मनिर्भर भारताचे प्रतिध्वनी उमटवणारे ठरले, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

2. शेतकऱ्यांची जमीन कोणी बळकावू शकत नाही!
‘कोणी मायेचा पूत शेतकऱ्यांची जमीन बळकावू शकत नाही’, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना सरकारतर्फे आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.  

3. १२ हजार बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्त्या
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही खरे आदिवासी सरकारी नोकऱ्यांपासून वंचित राहिले आहेत. गेल्या दोन वर्षांत आदिवासींची फक्त २८ पदे भरल्याची माहिती देण्यात आली.

4. मांजामुळे पशू-पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास कारवाई 
चिनी बनावटीचे धोकादायक धागे, काच आणि लोखंडी कण वापरून तयार केलेला मांजा वापरल्यामुळे अनुसूचीतील वन्यप्राणी किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पतंग उडवणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

5. “सीबीआयने अजूनही सांगितलं नाही, सुशांतची हत्या की आत्महत्या?”
नंतर या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. मात्र, सीबीआयकडून यावर कोणतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला आहे.    

6. चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही – फडणवीस
“चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

 7. शैक्षणिक कर्ज मिळाले नाही म्हणून आत्महत्येची परवानगी द्या  
शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनामध्ये नक्षलवादी होणाचा विचार येणे, हे तर राज्यकर्त्यांचे अपयश आहेच पण शेतकरी चळवळीचाही पराभव आहे, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले..  

8. कचोरे गावात शिवसेनेतर्फे रोजगार मेळावा   
यावेळी हॉस्पिटल, बीपीओ, मार्केटींग, बॅंकींग, अॅमेझॉन, फ्लिपकार्ड अशा ठिकाणी नोकरीच्या संधी तरुणांना या मेळाव्याच्या मार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

 9. चोपडा तालुक्यात कोरोना प्रसार पुन्हा बळावतोय
मागील आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या फक्त ७  असतांना  आता मात्र मागील ३ ते ४ दिवसात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होऊन ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ४३ वर पोहचली असल्याने हा प्रशासन तसेच नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

10. अंबरनाथ येथे अमंली पदार्थासह एका युवकाला अटक  
त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ 11ग्राम वजनाचे मैट्रान MD अमंली पदार्थ हे मादक द्रव्य व एक रिक्षा मिळुन एक लाख 57हजार 400 रुपये कीमतीचा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *