25 डिसेंबर Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - वनपरिक्षेत्रात विजेच्या धक्क्याने दोन बिबट्या आणि मुंगूस यांचा मृत्यू...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. जानेवारीपासून सर्व वाहनांवर फास्टॅग अनिवार्य
त्यामुळे वेळेची बचत होणार असून सुट्ट्या पैशांची डोकेदुखीही थांबणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे .
2. मुंबई पोलिसांच्या 24 तासातच मोठ्या कारवाया
मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या 'मिशन ऑल आऊट' संकल्पनेला चांगलं यश मिळालेआणि मुंबई पोलिसांनी २४ तासातच मोठ्या कारवाया केल्या.
3. कोल्हापूरच्या सुभद्रा एरिया लोकल बँकेचा परवाना रद्द
तसंच बँकेच्या कार्य पद्धतीवर बोट ठेवून हा परवाना रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेचं लायसन्स रद्द केलं होतं
4. युवक-युवतींना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे
सदर शिबीराचे दुसरे सत्र सुरू असून अजून एक सत्र होणार असल्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडत असल्याचे संदीप म्हात्रे यांनी सांगितले.
5. सर्वसामान्यांचे लाइट बिल माफ करा अन्यथा आरपीआयचा उग्र आंदोलनाचा इशारा
यावेळी येत्या पंधरा दिवसात तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला.
6. पंतप्रधानांकडून सराफवाडीतील संदीप धनवडे- पाटील परिवारास विवाह निमित्ताने शुभाशीर्वाद
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून शुभाशीर्वाद दिले. तसेच त्या पात्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
7. ३१ डिसेंबरची विशेष पार्टी करणाऱ्यांवर होणार कारवाई
३१ डिसेंबरच्या रात्री शहरी व ग्रामीण भागात असणाऱ्या फॉर्म हॉउस सह हॉटेलवर रात्रभर धिंगाणा चालु नये,यासाठी अकोला पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हाती घेण्यात येणार आहे.
8. केंद्रीय पथकाकडून पूरबाधित क्षेत्राची दुसऱ्यांदा पाहणी
पूरपरिस्थितीनंतर शासनाकडून मदत मिळाली का ? नूकसान झालेल्या क्षेत्रात आता काय आहे व किती उत्पन्न मिळाले ?याबाबत त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या प्रमुखांशी संवाद साधला
9. वनपरिक्षेत्रात विजेच्या धक्क्याने दोन बिबट्या आणि मुंगूस यांचा मृत्यू
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती मिळताचत्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृत बिबट्यांना व मुंगूस पोस्टमार्टम साठी दवाखान्यात हलवले.
10. नव्या वर्षाच्या निमित्ताने ताडोबा हाऊसफुल्ल
अनलॉक नंतर ताडोबातील पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने येणाऱ्या सुट्ट्यांच्या दरम्यान सेलिब्रेशनसाठी ताडोबा हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे ताडोबा वर आधारित पर्यटन व्यावसायिक समाधानी आहेत.
No comments
Post a Comment