Breaking News

1/breakingnews/recent

22 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - राज्यात अतिवृष्टीच्या मदतीबाबतचा केंद्रीय अहवाल दोन आठवड्यांत...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES

1. केंद्राच्या निमंत्रणावर शेतकरी संघटनांचा आज निर्णय
 दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल साखळी उपोषणात सहभागी होण्याला अधिक प्राधान्य दिले.  

2. राज्यात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी
 संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
3. राज्यात अतिवृष्टीच्या मदतीबाबतचा केंद्रीय अहवाल दोन आठवड्यांत 
 येत्या दोन आठवडय़ात किती मदत करता येईल किंवा किती नुकसान झाले होते, याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल असे पथकातील अर्थ विभागातील सदस्य आर.बी. कौल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

4. तलाठी भरती प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेश
 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे आंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.   

5. नवी मुंबईत महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी
 नवी मुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मने वळून त्यांना राष्ट्रवादीत जोडून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे  

6. मुंबई पालिका अलर्ट; हॉटेलांत दोन हजार खोल्या सज्ज
विमानाने येणाऱ्या या सर्व प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये विलगीकरणात रहावे लागणार आहे. हॉटेलात राहण्याचे शुल्क प्रवाशांनाच भरावे लागणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

7. सागरी किनारा मार्गाला आता जुलै २०२३ची मुदत
 मात्र न्यायालयीन प्रकरणे आणि टाळेबंदी यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत पुढे गेली आहे. हा प्रकल्प आता जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय पालिके ने ठेवले आहे

8. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करा - उपमहापौर  
अन्यथा मनपाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा ईशारा उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.  

9. रोड्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या 
 या अरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता त्यानं दोन दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

10. १४ गावांचा बहिष्कार यशस्वी करा आणि मटणाची पार्टी घ्या -  वालीलकर 
 १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने नागाव येथे बैठक घेत एकत्रित बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  तर बहिष्कार यशस्वी झाल्यास १४ गावांना मटणाची पार्टी देणार असल्याचे दहिसर मोरी गावचे ग्रामस्थ पांडुरंग वालीलकर यांनी आश्वासन दिले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *