Breaking News

1/breakingnews/recent

30 डिसेंबर Good Morning सह्याद्री

No comments

   News24सह्याद्री - 




TOP HEADLINES

1. चीनकडून क्षेपणास्त्र तैनात; पण भारतही सज्ज
राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने आणि हवाई सामथ्र्य यावर विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ते बोलत होते.

2. सरकारच्या इशाऱ्यानंतरही पंजाबमध्ये मनोऱ्यांची मोडतोड
दूरसंचार मनोऱ्यांची मोडतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा सरकारने इशारा दिलेला असतानाही निदर्शने करणारे शेतकरी आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेल्यांनी मंगळवारीही पंजाबमध्ये अनेक दूरसंचार मनोऱ्यांची मोडतोड केली.  

3. राज्यात दिवसभरात ५ हजारांहून अधिक जणांची करोनावर मात
 राज्यात आज ३,०१८ नवे करोना रुग्ण आढळले. तर राज्यात आज ६८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली

4. बेपत्ता १५७ मुलांचे गूढ कायम
 वसई-विरार आणि मीरा भाईंदर शहरातून मागील पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या अडीच हजारांहून अधिक अल्पवयीन मुलांपैकी १५७ मुला-मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचे पुढे काय झाले याचे गूढ अद्याप कायम आहे. या बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे.  

5. ५७ कोटींचा विकास निधी खर्चाविना पडून
 केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने तो खर्च कसा करायचा  याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. यासाठी परिषदेकडून विविध विभागांकडून सातत्य पाठपुरावा घेतला जात आहे.  

6. रायगडमधील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर
रायगड जिल्ह्य़ात रासायनिक कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. यात रसायनी येथील पातळगंगा इंडस्ट्रियल इस्टेट, रोहा येथील धाटाव आणि महाड येथील औद्योगिक वसाहतींचा समवेश आहे.

7.  पारस येथे एकाच रात्रीत  १२ घरफोड्या
पारस येथील विद्युत नगर येथील ६ घरांमध्ये चोरट्यानी हात साफ केला असून नगदी रोकड सोने चांदीचे किंमती आभूषण चोरून नेले, चोरटे एवढ्या वरच थांबले नसून परिसरातरील आणखी सहा घर फोडण्याचा प्रयत्न या चोरत्यानी केलाअसून त्यात ते असफल झाल्याने चोरट्याना वापस जावे लागले पारस येथील प्रतिष्ठित अश्या विद्युत नगर मध्ये चोरी झाल्याने पोलीस कर्मचारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहेय

8. बजाजनगर येथे श्री दत्त जयंती उत्सहात साजरी  
 श्री दत्त महाराजांचा जयघोष करत भाविक भक्त  तसेच  महिला मंडळ पावली , फुगड्या खेळण्यात मग्न झाल्या होत्या . यावेळी महाराणा प्रताप चौक येथील श्री दत्त मंदिर दत्तधाम, श्री चक्रधर स्वामी ट्रस्टच्या वतीने सकाळीच ८ वाजता मंदीरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर ९ वाजता मुर्तीची पालखीमध्ये  भव्य मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. 

9. 31डीसेंबर ला दारु पिवुन गाडी चालविणे पडणार महागात  
संचारबंदीचे उल्लघंन करणा-या नागरीकांना आता सरळ जेलची हवा खावी लागणार असल्याची माहिती शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.   

 10. डोंबिवलीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर
ईडी प्रकरणावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे .आज डोंबिवली मध्ये स्टेशन परिसरात शिवसैनिकानी काल संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात केलेल्या विधानाचे बॅनर झळकावले असून राऊत याना पाठिंबा दर्शवला आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *