Breaking News

1/breakingnews/recent

बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो : संजय राऊत

No comments

 News24सह्याद्री - 



मुंबई - 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटले आहे की, पवार हे देशाचे नेते आहेत. भविष्यात त्यांना राष्ट्रीयस्तरावर मोठी संधी प्राप्त होवो, अशी अपेक्षा व्यक्त करतो, तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बोट धरून आम्ही पुढे आलो आहे . पवारांकडून आम्ही रोज प्रेरणा घेतोय. त्यांचे वय कोणी मोजू नये,अशा शब्दांत राऊत यांनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ऐंशीवा वाढदिवस आहेस. त्यानिमित्ताने संजय राऊत यांनी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं भरभरून कौतुक करत म्हटले आहे की , पवारांकडून आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते. त्यांचे बोट धरूनच आम्ही राजकारणात आलो आहोत. गेल्या पाच पिढ्यांना शरद पवार प्रेरणा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या वयाचा कोणी हिशोब करू नये. ते त्यांच्यावर अन्याय करणार ठरेल. सगळे तरुण फिके पडतील अशा प्रकारचे काम ते आजही करत असतात. त्यांच्याकडून आम्ही रोज प्रेरणा घेत असतो. त्यामुळेच त्यांच्या वयाचा हिशोब करणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असे राऊत म्हटले आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *