Breaking News

1/breakingnews/recent

शेतकऱ्यांना अडचणीची ठरणारे सर्व अडथळे, भिंती आम्ही हटवत आहोत : पंतप्रधान मोदी

No comments

  News24सह्याद्री - 




नवी दिल्ली -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या ९३ व्या जनरल बैठकीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सध्या ज्वलंत बनलेल्या कृषी कायदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवाहन करत म्हटले आहे की,  शेतकऱ्यांना अडचणीची ठरणारे सर्व अडथळे, भिंती आम्ही हटवत आहोत, असे मोदी म्हणाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नव्या कृषी कायद्यांची स्तुती केली आहे. कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांवर भाष्य करत त्यांनी या कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा असो, फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन यामध्ये आपण अनेक अडथळे पाहिले आहे. आता यांच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत. या सुधारणांनंतर शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होती, तंत्रज्ञानाची मदत मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक फायदा आपल्या शेतकऱ्यांनाच होणार असल्याचे मोदी म्हणाले आहे.

तसेच, “शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्राने कृषी क्षेत्रावर हव तसे काम केले नाही. कृषी क्षेत्रात ज्या खासगी कंपन्या चांगलं काम करत आहेत त्यांना अधिक चांगले काम करण्याची आवश्यकता आहे,” असेही ते म्हणाले आहे. भारतातील बाजारांचे आधुनिकीकरण होत आहे. देशात सर्वत्र सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज भारतात कॉर्पोरेट टॅक्स हा जगात असलेल्या टॅक्सपेक्षा सर्वात कमी आहे. देश आज प्रगतीपथावर आहे. जेव्हा एक क्षेत्र विकसित होते तेव्हा त्याचा इतर क्षेत्रांवरही सकारात्मक परिणाम होत असल्याचे ही मोदी म्हणाले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *