Breaking News

1/breakingnews/recent

ठाकरे यांच आजच समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती आणि उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण : केशव उपाध्ये

No comments


मुंबई -

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी मुंबई मेट्रो आणि कारशेडच्या प्रस्तावित जागेवर भाष्य केले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री यांनी विरोधकांना टोला लगावला होता. यानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, “अभिमान आणि अहंकार यात अंतर असते. मुंबईबद्दल अभिमान असलाच पाहिजे पण अहंकारातून आपण मुंबईकरांच नुकसान करत आहात. ज्या कांजूरमार्गचे समर्थन आपण करत आहात. त्या ठिकाणी कारशेड होण्यातल्या अडचणी आपण नेमलेल्या मनोज सौनिक समितीने दाखवून दिले आहेत. कांजूरचा फिजीबिलीटी रिपोर्ट व अन्य अहवाल कुठे याचाही आपल्या आजच्या भाषणात काही उल्लेख नाही.” असे उपाध्ये म्हणाले आहे. तसेच, मेट्रो कारशेड हा कुणाच्या श्रेयाच्या प्रश्न नाही तर मुंबईकरांना आवश्यक असलेल्या सेवेचा आहे, त्यामुळे अन्यत्र लक्ष वेधण्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकारने नेमलेल्या मनोज सौनिक सरकारचा अहवाल आजच्या भाषणात मांडायला हवा होता. म्हणजे वस्तुस्थिती काय ते लक्षात आले असते, असेही ते म्हणाले.

तसेच उपाध्ये पुढे म्हणाले की , “मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच आजच समाजमाध्यमावरील भाषण म्हणजे कृती आणि उक्ती यांच्यातल्या अतंराच उत्तम उदाहरण होते. गेले वर्षभर सरकार विकास करत असल्याचा दावा त्यांनी केला व आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ जी चार उदाहरण दिली ती सर्व कामे मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाली होती. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनेने विरोध केला होता. इतकेच काय गिरगावात मेट्रो आणायला विरोध केला होता. बुलेट ट्रेनला विरोध आणि अन्य विकास प्रकल्पना विरोध व स्थगिती हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *