मोठी बातमी - जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश
News24सह्याद्री -
नगर बीड व सोलापूर या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत दहापेक्षा अधिक नागरीकांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचा वनविभागाने अखेर आदेश दिला आहे . नरभक्षक झालेल्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करा तसे होत नसेल तर बेशुद्ध करा अन्यथा ठार मारा असे आदेश राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी नगर बीड आणि सोलापूर वविभागाला दिले आहेत नगर जिल्ह्यातील कर्जत आणि पाथर्डी तालुक्यात तीन बालके तर बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांसह शेतकरी आणि काही महिलांचा जीव गेला आहे या नरभक्षक बिबट्या मुळे तीनही जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले होते अनेक नागरिकांनी या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी केली होती वनविभागाने सुद्धा अनेक ठिकाणी पिंजरे लावून या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालवले आहेत मात्र नरभक्षक बिबट्या आद्यपही वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला नाही अखेर आज राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत
No comments
Post a Comment