Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - नववर्षाचे स्वागत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत करावे - जिल्हाधिकारी

No comments

    News24सह्याद्री - नववर्षाचे स्वागत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत करावे - जिल्हाधिकारी...पहा जिल्ह्याची खबरबात



TOP HEADLINES


1. जिल्हावासियांनी नववर्षाचे स्वागत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत करावे - जिल्हाधिकारी 
घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. यासंदर्भात राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सरत्या वर्षाला निरोप द्यावा आणि नववर्षाचे स्वागत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

2. सत्तेतून जाणार महाविकास आघाडी 
 पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य करत  जेव्हा काँग्रेस पक्ष करील बंड तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार पडेल थंड महाराष्ट्रात लवकरच होईल या सरकारमध्ये बिघाडी सत्तेतून जाणार महाविकास आघाडी' अशा कवितेतून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचे भाकीतहि आठवले यांनी  वर्तवले. 

3. गावात दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी; रोहित पवारांनी
निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला ३० लाखांचा निधी देण्याची घोषणा करतानाच निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही त्यांनी तंबी दिली आहे. कोणी असे प्रकार केले तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड इशाराच आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

4. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात! 
 दिवाळीच्या दरम्यान पदभार स्विकारणार्‍या देशमुख यांनी पोलीस कर्मचार्‍यांना शिस्तीचे धडे देत मोठ्या कालावधीनंतर शहरात पोलिसांचे अस्तित्त्व दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना मुख्यालयाचे बोलावणे आल्यावर  शहरातून विरोधही झाला होता, मात्र अवघ्या पंधरा दिवसांतच ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्याने त्यांच्या बदलीनंतर ‘अदृष्य’ झालेले पोलीस आज सकाळपासूनच शहरातील रस्त्यारस्त्यावर दिसू लागले . 

5. राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जय्यत तयारी 
 निवडणूक कर्मचाऱ्यांना १ व ८ जानेवारी रोजी कृषी विद्यापीठ येथे निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याबाबत निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी माहिती दिली.

6. जामखेड शहरातील अनाधिकृत  टपऱ्या हटवण्याचे  काम सुरू
 काही  टपऱ्या अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन काढल्या आहेत. मात्र या मध्ये काही न्यायप्रविष्ट  असल्याने त्यांची सखोल चौकशी करून त्या देखील हटवण्याच काम सुरु आहे , मात्र या अनधिकृत टपर्या हटवताना  दुजाभाव न करता सरसकट टपऱ्या काढाव्यात अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे . 

7. लोणी  ग्रामदैवत म्हसोबा यात्रोत्सव : खा.डॉ.सुजय विखेंच्या हस्ते अभिषेक
कोरोना चे सर्व नियम पाळून म्हसोबा महारांचा अभिषेक घालण्यात आला . तसेच  भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के तसेच  लोणी गावातील ग्रामस्थ यांच्या हस्ते काठीची पूजा करण्यात आली . यावेळी  भाविकांनी गर्दी टाळावी व सोशल डिस्टन्स पाळून दर्शन घ्यावे असे देवस्थान कमिटीकडून सांगण्यात आले . 

8. शिर्डी विमानतळासाठी तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून देणार 
 शिर्डी विमानतळासाठी तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी माहिती दिली  . तर आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी विमानतकळाच्या समस्यांकडे  पवार यांचे लक्ष वेधत महत्वाच्या मागण्या केल्या . 

9. महापौर बाबासाहेब वाकळे हे विकासाभिमुख नेतृत्‍व - मंत्री आठवले  
बुध्‍द विहार बांधून एक प्रकारे शांततेचा संदेश देण्‍याचे काम केले आहे. यामाध्‍यमातून सर्व समाज एकत्र येवून आपल्‍या विचाराची देवाण घेवाण याठिकाणी केली जाईल.असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला . तसेच महापौर बाबासाहेब वाकळे हे विकासाभिमुख नेतृत्‍व असल्याचे  गौरवूद्गारही आठवले यांनी यावेळी काढले . 

10. दत्त जयंतीनिमित्त  साई  मंदिरात सजावट
श्री दत्त जयंतीनिमित्त शिर्डी येथे साई संस्थानच्या वतीने साई  मंदिरात सजावट करण्यात आली आहे , मंदिर परिसर फुलांच्या माळांनी व विद्युत रोषणाईने लखलखून गेला असल्याचे चित्र सध्या शिर्डीमध्ये पाहायला मिळत आहे, , यासह  लेंडी बागेतील श्री दत्त मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवण्यात पाहायला मिळत आहे , दिल्लीतील साईभक्त रंजनी डंग यांच्या देणगीतून ही सजावट करण्यात आली आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *