Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - रेखा जरे हत्याकांड : ‘या’ लालसेने सागर भिंगारदिवेने घेतली होती सुपारी!

No comments

  News24सह्याद्री -  




रेखा जरे हत्याकांडाशी निगडीत मोठी बातमी हाती आली आहे. जरे यांचे हत्याकांड बाळ बोठे याने घडवून आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बोठे याने हत्याकांडाची सुपारी दिलेल्या सागर भिंगारदिवे यास ताब्यात घेतले. सागर भिंगारदिवे यास बोठे याने नक्की कशासाठी आणि कोणत्या मोबदल्यात ही सुपारी दिली याची माहिती पोलिस घेत आहेत. हत्याकांडातील सहभागी आदित्य चोळके, गुड्डू शिंदे, फिरोज शेख यांच्याकडून पोलिसांनी सव्वासहा लाखांची रक्कम जप्त केली आहे. मात्र, सागर भिंगारदिवे याच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे.पत्रकारीता क्षेत्रात काम करणार्‍या बाळ बोठे याने सागर भिंगारदिवे यास विधानसभा उमेदवारीचा शब्द दिला होता. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघातून एका मोठ्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी बाळ बोठे याने घेतली होती आणि तसा शब्द भिंगारदिवे यास दिल्याची माहिती पुढे आली आहे. 

सागर भिंगारदिवे हा नगर शहराजवळील केडगाव उपनगरात राहतो. त्याने महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारीही केली होती. मात्र, तो पराभूत झाला होता.श्रीरामपूरमधून उमेदवारी मिळवून देण्यासाठी उत्तरेतील मोठ्या नेत्याला बोठे हा शब्द टाकणार होता. हा नेता माझा कोणताच शब्द खाली पडू देत नाही असा विश्‍वास बोठे याने सागर भिंगारदिवे यास दिला होता.सागर भिंगारदिवेकडून हा मोठा खुलासा समोर आलाय! हत्याकांडात पकडले गेल्यानंतर आता सागर भिंगारदिवे याचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले! मात्र, बाळ बोठे याने अत्यंत हुशारीने सागर भिंगारदिवे याचा वापर करून घेतल्याचे समोर आले आहे. जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे हा अद्यापतरी पोलिसांना मिळून आलेला नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *