जिल्ह्याची खबरबात - आमचं आरक्षण कोणी हिरावून घेणारं नाही - वड्डेटीवार
News24सह्याद्री - आमचं आरक्षण कोणी हिरावून घेणारं नाही - वड्डेटीवार...पहा जिल्ह्याची खबरबात
1. आमचं आरक्षण कोणी हिरावून घेणारं नाही आणी आम्ही कोणाला घुसूहि देणारं नाही - वड्डेटीवारांचा इशारा
अहमदनगर मध्ये मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या अध्यक्षतेखाली OBC समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वड्डेटीवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आमचं आरक्षण तर कुणीच काढू शकणार नाही, आणी आरक्षणा मध्ये आम्ही कोणाला घुसूहि देणारं नाही आणी घुसले तर ५४% टक्के समाज रस्त्यावरती उतरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र वड्डेटीवारांचा हा ईशारा नेमका कोनाला होता याबाबत आता चर्चेला उधाण आलं आहे.
2. रामाला मानणारे वचन कसे मोडतात ; अण्णा हजारे
रघुकुल रीत सदा चल आई
प्राण जाई पर वचन न जाई
हा रामायणातील दोहा सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. एका बाजूला रामाचे नाव घेऊन राज्य करायचे आणि दुसरीकडे प्रभू राम यांचा आदर्श बाजूला सारून दिलेली वचने पाळायची नाहीत, असा या सरकारचा कारभार सुरू असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी आपण केलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी हजारे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनापेक्षा आपल्या मागण्या वेगळ्या असून त्या आंदोलनावर आपले आंदोलन अवलंबून नसल्याचे संकेतही हजारे यांनी दिले आहेत
3. काँग्रेस सर्वांत मोठा तोट्यातील पक्ष ठरेल, प्रदेश पदाधिकाऱ्याचे खुले पत्र
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाची धुसमट कायम असल्याचे दिसून येत असून मंत्र्यांसोबत आता पदाधिकारीही यावर भाष्य करू लागले आहेत. ‘शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या पारनेरच्या नगरसेवकांना परत पाठविले मात्र, भिवंडीत काँग्रेसच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश कसा दिला? शिवसेनेकडे मुख्यमंत्र्याची ताकद तर दुसरीकडे राष्ट्रवादीची आक्रमकता यामध्ये काँग्रेसपक्ष सापडला असून तो सर्वांत मोठा तोट्यातील पक्ष ठरेल,’ असे खुल पत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी लिहिले आहे.
4. शिर्डीतील व्यवसायिकांना दिलासा राहता
शिर्डी मध्ये येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढू लागला आहे , साई संथान प्रशासनाने कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत योग्य ती खबरदारी घेतल्याने भाविकांची पावले देखील या मंदिराकडे वळू लागल्याचे दिसते , यामुळे शिर्डीतील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला . दरम्यान टाळेबंदीकाळात आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या या व्यावसायिकांचे व्यवसाय आता पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.
5. रब्बी हंगामातील पहिल आवर्तन 15 जानेवारीपासून
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कालवा-सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली, या बैठकीत मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिल आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला , रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल यासह 10 मे ते 18 जून या काळात आवर्तन सोडण्यात येण्याची शक्यता आहे .
6. मंगलकार्यालय परिसरातून ९ तोळे सोने चोरटयांनी केले लंपास जामखेड
जामखेड येथे एका मंगल कार्यालयातुन साडेचार लाखाचे ९ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले . . निलेश देशमुख लग्नात नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक पहात असताना त्यांच्या हातातील कापडी पिशवी चोरटयांनी नजर चुकवून ब्लेड च्या सह्याने कापली . व त्यातील दागिने घेऊन चोरटे पसार झाले या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7. राहुरी शहरात मनुस्मृति दहन कार्यक्रम जल्लोषात साजरा
राहुरी शहरात मनुस्मृति दहन कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला . शहरातील समविचारी संघटना यांसह वंचित बहुजन आघाडी च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले , व त्यानंतर मनुस्मृति दहन करण्यात आले , यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त करत आजच्या वास्तवाबाबत चिंता व्यक्त केली .
8. राजकीय दबावापोटी लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल - वैशाली स्वामी
राजकीय दबावापोटी लॉरेन्स स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनि केला आहे . लॉरेन्स स्वामी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आणखी काही खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यताहि वैशाली स्वामी यांनि व्यक्त केली आहे . त्यामुळे या या प्रकरणाची सखोल चौषी करत नायय द्यावा अशी मागणी स्वामी यांच्या पत्न्नीने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे . यासंदर्भातीळ निवेदनही त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले .
9. पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांनी घेतले साईबाबाचे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक, श्री सुबोधकुमार जयसवाल हे आज अहमदनगर जिल्हा दौ-यावर होते ,पहिल्यांदाच जयस्वाल अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आल्याने त्यांनी शिर्डीला भेट देत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.व कोरोनाच संकट दूर होऊ दे असं साकडं त्यांनी साई चरणी घातले . यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थित होते.
10. जिम बंद पाडण्यासाठी तरुणांनी लढवली शक्कल अकोले
जिमचे पैसे मागितल्याचा राग आला म्हणून जिम बंद पाडण्यासाठी तीन तरुणांनी जालीम शक्कल लढवल्याचा धक्कादायक प्रकार अकोले शहरात घडला .दरम्यान हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांना रेकॉर्डिंग , व्हिडिओ क्लिप आणि प्रत्यक्ष साक्षीदार देऊनही पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली , या पार्श्वभूमीवर अकोले पोलीस ठाण्यामध्ये प्रभारी पोलीस अधिकारी नसल्यामुळे कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप येथील नागरिक करताहेत .
No comments
Post a Comment