Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकत घेणार्‍यास अटक

No comments

       News24सह्याद्री जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकत घेणार्‍यास अटक...पहा शहराची खबरबात




TOP HEADLINES


1. डॉ. सुधा कांकरिया यांना पद्मश्री किताबाने सन्मानीत करावे - जिल्हाधिकारी  
कार्यात देशभरात लाखो लोकांचा सहभाग व यश पहाता डॉ. सुधा कांकरिया यांना पद्मश्री किताबाने सन्मानीत करावे असा प्रस्ताव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण केंद्र शासनाकडे पाठवू, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. उजेडाचे मानकरी सन्मान सोहळयाने नगर जिल्हयाच्या वैभवात भर पडली आहे असेही ते म्हणाले.

2. डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कस्टडीत वाढ
 त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आता या पोलिस कोठडीत दि.2 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नगरमधील शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी डॉ.शेळके याच्यावर गुन्हा दाखल आहे.

3. जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकत घेणार्‍यास अटक  
कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथे जावून आरोपी करण रोकडे याला ताब्यात घेतले असून त्याला भिंगार कॅम्प पोलिसांकडे सुपुर्द केले आहे.

4. कृषी विधेयकावर चर्चा चालू असताना शरद पवार गैरहजर का राहिले? - पाशा पटेल 
 शरद पवार कृषी मंत्री असताना या विधेयकाचा द्राफ्ट तयार झाला असताना आणि आता शरद पवार राज्यसभेचे सदस्य असताना आणि या विधेयकावर चर्चा चालू असताना शरद पवार गैरहजर का राहिले अशी टीका कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी नगरमध्ये बोलताना केली. 

5. शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा  
शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *