Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - कोरोनाच्या लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण माहिती

No comments

      News24सह्याद्री -




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि सर्वपक्षीय बैठकीत  विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधताना कोरोना  लसी बाबत मोठं वक्तव्य केले आहे . पुढच्या काही दिवसातच कोरोनाची लस तयार होणार  असून ती लवकरच नागरिकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली  .  केंद्र सरकार आणि राज्य सरकार ची टीम  एकत्रितरित्या  यावर काम करत आहे   त्यामुळे आता वैज्ञानिक या लसी बाबत हिरवा झेंडा कधी दाखवतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे . मात्र पंतप्रधानांनी कोरोनाच्या लसीबाबत सकारात्मक वक्तव्य केल्याने आता लवकरच कोरोनाची लस भारतीयांसाठी उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत , कोरोनाची दुसरी लाट आली असतानाच कोरोना लसीबाबत हे सकारात्मक संकेत मिळाल्याने काही प्रमाणात का होईना दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *