Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - बाळ बोठे याने केला होता रेखा जरे यांचा छळ, जीवे मारण्याचीही दिली होती

No comments

  News24सह्याद्री - 




जरे हत्यकांडात आणखी एक गौप्यस्फोट समोर आलाय! रेखा जरे हत्याकांडात आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय! जरे यांचा चोवीस वर्षीय मुलगा रुणाल याने पोलिस अधीक्षकांना आज निवेदन दिले. बाळ बोठे याच्या विरोधात धक्कादायक माहिती या निवेदनात त्याने दिलीय. या निवेदनात रुणाल जरे याने म्हटले आहे की, या हत्याकांडातील आरोपींनी माझ्या आईच्या हत्याकांडाची कबुली दिली असून या घटनेचा सुत्रधार हा पत्रकार बाळ बोठे हाच आहे. बाळ बोठे याचे आमच्या घरी नेहमी जाणे- येणे असायचे. माझ्या आईचा त्याने अनकेदा मानसिक व शारीरीक छळ केला होता. तो  तिला नेहमी जिवे मारण्याची धमकी द्यायचा. तुला नाहीतर तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही असेही तो आईला बोलायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कोणीच त्याच्या विरोधात बोलत नव्हतो. माझ्या आईने यापूर्वीही त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात अर्ज दिलेअसल्याचे रुणाल जरे याने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बाळ बोेठे याच्यासह त्याच्या समर्थक, हस्तकांकडून आपल्या जिवीताला धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे. बोठे कोणत्याही क्षणी आमचा खून करू शकतो अशी भिती व्यक्त करतानाच पोलिस संरक्षण देण्याची मागणी रुणाल जरे यांनी केली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *