Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - चीनची आगळीक; युद्धाचे ढग!

No comments

 News24सह्याद्री -




आताच्या घडीची मोठी बातमी आहे. भारत आणि अमेरिकेसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी मोठं वक्तव्य केले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा असे आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकार्‍यांना संबोधित करताना शी जिनपिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे.चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. तैवानच्या मुद्द्यावरुनही जगभरातील देशांनी चीनच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच अमेरिकेसोबतही वेगवेगळ्या स्तरावर चीनचा तणाव वाढत आहे.

 या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी लष्कराला केलेल्या युध्दासाठी तयारी राहण्याच्या आवाहनामुळे जगभरातील देशांच्या भुवया उंचावल्या आहेत.शी जिनपिंग म्हणाले की, सैनिकांनी संकाटाची चिंता करु नये. आपल्याला युध्दाला सामोरं जावं लागणार आहे या दृष्टीकोनातून लष्कराने ट्रेनिंग आणि तयारी करावी. पीपल्स लिबरेशन आर्मीचा विस्तार करणं हेच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ध्येय आहे. चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपदही शी जिनपिंग यांच्याकडेच आहे. सेट्रल मिलिटरी कमिशनच्या अंतर्गत २० लाख संख्येच्या चीनी लष्कराचा समावेश होतो.पे्रक्षकहो,चीन प्रोपगंडामध्ये माहिर आहे. या कौशल्याच्या जोरावर सातत्याने तो भारत, तैवान आणि अमेरिकेला वेगवेगळ्या पध्दतीनं आव्हान देत आला आहे. मात्र, असे असले तरी आज चीनी राष्ट्रपतींनी घेतलेली भूमिका दुर्लक्षणासारखी नसल्याचे बोलले जाते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *