दिवाळी स्पेशल - सर्वासाठीच आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण 'धनत्रयोदशी'
News24सह्याद्री -
आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली
दिवाळी उत्सवातील दुसरा विशेष दिवस म्हणजे म्हजणजे धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो.
अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो.बरेचस्या लोकांचे मानणे आहे कि याच दिवशी देवी लक्ष्मी गृहप्रवेश करतात त्यामुळे दारिद्र्याचे पतन होते. सकारात्मक उर्जा घरात पसरली जाते.
दिवाळी उत्सवाच्या या दिवशी रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने, . ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनचं ह्याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यू चे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते.दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, "आपो दीपो भवः", म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रकाश रूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात, की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही.
त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित्त व्हावे लागेल. जर एकसुद्धा नाराज राहिला, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका, तर सगळ्यांना तो गोडवा वाटा. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करत हा उत्सव साजरा करू
No comments
Post a Comment