Breaking News

1/breakingnews/recent

शिवसेनेच लग्न एकाशी आणि लफड दुसऱ्याबरोबर : मनसे नेते संदीप देशपांडे

No comments

   News24सह्याद्री - 




मुंबई - 

 
 शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही, सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात परब यांनी मनसेवर टीका केली आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत 'लाव रे तो व्हडिओ' दाखवून उघड नागड केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय परिस्थिती होते ते पुढे दिसेल', असा हल्लाबोल परब यांनी केला आहे. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले आहे की, 'शिवसेनेच लग्न एकाशी आणि लफड दुसऱ्याबरोबर' असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेन जे केल ते उघडपणे केल. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

तसेच, शिवसेनेन हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असे सांगितल होत. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत बसले आहेत, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचा जीव महापालिका रुपी पोपटामध्ये अडकला आहे. आज 'कृष्णकुंज'चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे', अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *