अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली : राष्ट्रवादी नेत्यांची चिठ्ठीत नावं
मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थान असलेल्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. पवार यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावे आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन जण फरार आहे
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. या लोकांच्या जाचाला आपण कंटाळलो असून निराशेमुळे आपण आत्महत्या करत आहोत. शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहे. प्रीतम यांनी दाखल केलेल्या तक्रारीमधील जवळवजवळ सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. आरोपींपैकी काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्याचे म्हटले आहे
यापैकी सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडली आहे. आरोपींनी प्रतीम शाह यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी हे सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करत होते असा आरोप केला जात आहे. पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.

No comments
Post a Comment