राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का अजितदादांचे स्पष्ट उत्तर
मुंबई
पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारली नाही. तसेच,राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईलअहमदाबादमध्ये रात्रीचे लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थितींचा आढावा घेतला जात आहे. आणखी 10 ते 15 दिवस राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईलराज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार का? असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, 'परिस्थिती कशा प्रकारची समोर येणार हे त्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आताच मी काही घोषणा करणे योग्य ठरणार नाही.
मी आज काही बोललो तर लोकं जास्त त्रस्त होतील. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या किती आणि कशी वाढते यावर पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे जे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. ते सेंटर तातडीने सुरू करता येईल. व्हेंटिलेटर बेड, साधे बेड हे खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते, आता जर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर पूर्ण क्षमतेनं सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल

No comments
Post a Comment