अजित पवार यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
मुंबई
अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली. 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुकण्यासारखे आहे. पवारसाहेबांवर बोलण्या इतकी आपली किंमत आहे का? अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली. पुण्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्या शैलीत भाषण करत भाजप नेत्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
महाराष्ट्रातील काही नेते हे काही पण बरगळायला लागली आहे. खास करून विरोधीपक्षातील नेते बोलत आहे. भाजपचे नेते तर खालच्या पातळीला गेले आहे. काहीजण अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहे. ज्यांना समाजामध्ये कवडीची किंमत नाही, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडले.महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाची परंपरा आहे पण काहीजण राजकारण करत आहे. आपण कोणाबद्दल काय बोलतो हे विरोधी पक्षाच्या काही लोकांना कळत नाही आहे अशी टीका अजितदादा यांनी केली

No comments
Post a Comment