Breaking News

1/breakingnews/recent

अजित पवारांचे महत्त्वाचे वक्तव्य

No comments





मुंबई 

अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत मत व्यक्त केले.शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झाले. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयांमध्ये ईडीच पथकाने शोधमोहिम हाती घेतली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीच पथक पोहोचले आणि विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर तोंडसुख घेतले. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काहीही वक्तव्य केले नव्हते. अखेर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत मत व्यक्त केले.‘इडी’च्या कारवाईत पोलिसांचा वापर केला जातो पण सीआपपीएफच्या जवानांना घेऊन कारवाई करण्यात आली. याबद्दल अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारित असलेल्या एजन्सींचा वापर कसा करावा या पूर्णपणे केंद्राचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करत असते. राज्यात काही समस्या उद्भवली तर राज्यातील सरकारचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. 

राज्यातील पोलिसांनी विविध सरकारांच्या काळामध्ये चांगले काम केलेले आहे. या वेळी ‘ईडी’च्या कारवाईसाठी पोलिसांना सोबत का घेतले नाही त्याची कल्पना नाही!”कार्यकर्ते, आमदारांमध्ये चलबिचल नको म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवत आहे “माझ्या अद्याप प्रताप सरनाईक यांच्याशी बोलण झालेल नाही किंवा इतर कोणाशीही बोलण झालेल नाही. आम्ही कॅबिनेट बैठकीत असताना मला ही बातमी मिळाली. कॅबिनेट संपल्यावर मी लगेच कराडला निघालो. तिथून रात्री पुण्याला वास्तव्यास थांबलो आणि आता सकाळी तुमच्यासमोर आहे. त्यामुळे मला या संदर्भात माहिती घ्यायला जमलेल नाही. पण मी इतकंच सांगतो की शरद पवार यांनी या प्रकरणावर अतिशय योग्य अस मत पक्षाच्या वतीने मांडलेल आहे


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *