सामान्य नागरिकांना एवढ्या किंमतीला मिळणार कोरोना लस..
नवी दिल्ली
कोरोनाचा नायनाट करणारी लस शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ काम करत आहे. सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्रेजेनेका यांच्याकडून तयार केली जाणारी लस अगदी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आशेचा किरण दिसत आहे.अजुन कोणाला यश मिळाले नसले तरी युध्दपातळीवर सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत जरी लस शोधली गेली इतक्या कमी कालावधीत विकसित करून बाजारात दाखल झालेली ही पहिलीच लस असणार आहे.
आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध व्यक्तींसाठी ऑक्सफर्ड लस येत्या वर्षातील एप्रिल २०२० ला बाजारात दाखल होईल. ते पुढे म्हणाले सामान्य लोकांसाठी, लसीच्या दोन आवश्यक डोसांची किंमत 1000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र हे शेवटच्या चाचणीच्या निकालावर आणि नियामक संस्थांकडून मंजुरीवर अवलंबून असेल.

No comments
Post a Comment