Breaking News

1/breakingnews/recent

राहुल गांधी यांचे मोदींवर टीकास्त्र..

No comments







दिल्ली 

 मनरेगा मजुरांना पैसे काढण्यासाठी होत असलेल्या त्रासावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. वेगवेगळ्या निर्णयावरून मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे काढण्यासाठी होत समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा वृत्त जनसत्ताने दिले आहे. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर धोरणांवरून टीका केली आहे.आधी तुघलकी लॉकडाउन लागू केला, कोट्यवधी मजुरांना रस्त्यावर आणले. नंतर त्यांचा एकमेव आधार असलेल्या मनरेगाची कमाई बँकांमधून काढणही अवघड करून ठेवले.

 मोदी सरकार फक्त बोलण्यापुरतच असून, गरीबांचे अधिकारांची पायदळी तुडवत आहे. जनसत्तानं एका पाहणी अहवालातील आकडेवारीचा हवाला देत वृत्त प्रसिद्ध केले होते. पाहणीनुसार एका मजुराला मनरेगावरील कामापोटीचा मोबदला बँकेतून काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटलेल आहे. एका मजुराला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी ६ रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याचबरोबर बँकेत जाण्यासाठी ३१ रुपये आणि एटीएमपर्यंत जाण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी ६७ रुपये खर्च करावा लागत असल्याचे पाहणीत म्हटले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *