Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - नरभक्षक बिबट्याच्या धास्तीनं नगरकर परेशान; महिन्यात घेतले तीन बळी

No comments

  News24सह्याद्री -


कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या नगरकरांचा जीव आता बिबट्याच्या धास्तीने टांगणीला लागलाय! जंगलात दिसणारा आणि संचार करणारा बिबट्या आता लोकवस्तीत दिसू लागलाय! त्याचा फक्त वावर असता तर गोष्ट फार चिंतेची नव्हती. मात्र, तो नरभक्षक होऊ लागलाय! पाथर्डी तालुक्यात मागील काही दिवसात सलग तीन दिवस धुमाकुळ घालत दोन बालकांचा जीव घेतला. वन विभागाने प्रचंड मेहनत घेतली आणि हा नरभक्षक बिबट्या पकडल्याचे जाहीर केले. यातून नगरकरांनी मोकळा श्‍वास घेतला. मात्र, तो क्षणीक ठरला. पाथर्डीच्या शेजारीच म्हणजेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने पंचायत समिती सदस्याच्या पतीवर हल्ला केला. त्यात ते जागीच ठार झाले. या घटनेच्या काही तास आधी बिबट्याने चांदबीबी महालावर दर्शन दिले. त्याच्या आधी नगर तालुक्यातील बाबुर्डी व परिसरात दर्शन दिले. याचाच अर्थ बिबट्यांची संख्या वाढली आहे.

जंगल कमी झाले आणि त्यातूनच जंगलातील हा बिबट्या मानवी वस्तीत घुसला असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. नैसर्गिक असमतोल बिघडला आणि बिबट्याला आवश्यक असणारे भक्ष्य मिळणे दुरापस्त झाले. त्याचाही काहीसा परिणाम झालाच! बिबट्यांच्या या मुक्त संचाराने आणि नरभक्षक होण्याने तमाम मानव जातीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची गरज आहे. चांँदबीबी महाल परिसर हा वन्य प्राण्यांसाठी खुला असल्याने येथे पिंजरे लावता येतणार नसल्याची भूमिका वन विभागाने घेतली आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *