सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - कोरोनाचा प्रकोप; कन्टेन्मेंट झोन अधिक कडक होणार, एक डिसेंबरपासून अंमलबजावणी
News24सह्याद्री -
आपणा सर्वांनाच काळजीत टाकणारी बातमी आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असं वाटत असतानाच तो वाढत असल्याचे समोर आले. दसरा- दिवाळी सणात अतीउत्साही नागरिकांनी कोणतेही नियम पाळले नाही. परिणामी या सणाच्या निमित्ताने कोरोनाच कमबॅक झालं असं म्हटल तर वावगे ठरणार नाही. देशात अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंटेन्मेंट, सर्व्हेक्षण आणि दक्षता यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. या मार्गदर्शक सूचना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लागू असणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त आवश्यक कामांना परवानगी देण्यात येईल असे गृह मंत्रालयाने सांगितले. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक जिल्हा, पोलीस आणि महानगरपालिका अधिकार्यांची असणार आहे. याव्यतिरिक्त, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संबंधित अधिकार्यांसोबत जबाबदारी निश्चित करतील. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत चालला आहे. आता आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. प्रशासन याबाबत वारंवार आवाहन करीत आले आहे. आता आपणच आपल्याला आणि आपल्या जीवलगांना वाचवू शकणार आहोत! सोशल डिस्टन्सींंग, मास्क आणि सॅनीटायझरचा वापर करा! स्वत:सह समाजाची काळजी घ्या.
No comments
Post a Comment