Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - पोलिसांनी जप्त केलेले गोवंश मांस कचरा डेपोतून पुन्हा कसे जाते चोरीला!

No comments

   News24सह्याद्री -



अत्यंत धक्कादायक आणि जिल्ह्याला हादरा देणारी बातमी आहे की, गोवंशीय मांसाबाबत पोलिस कारवाई करीत असले तरी तो देखावाच असल्याचे आता लपून राहिलेले नाही. मनपा आरोग्य विभाग आणि गोवंश मांसाचे व्यापारी यांचे संगनमत उघड झाले आहे. या दोघांनी संगनमताने कचराडेपोवर गेलेले गोवंशीय मांस पुन्हा त्या डेपोवरून चोरले! आणि ते दुसर्‍या जिल्ह्यात रवाना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी जप्त केलेले गोवंशीय मांस नष्ट करण्यासाठी महापालिकेच्या कचराडेपोवर पाठविले गेले असताना ते तेथून गायब झाले! तेथे हे मांस खाली करून पोलिस बाहेर पडताच संबंधितांची दुसरी गाडी लागलीच डेपोवर येत आणि हे मांस घेऊन जात आहे.

मनपाची यंत्रणा किती बरबटलेली आहे हे आता स्पष्टपणे समोर आले आहे. आरएसएस विचारसरणीत वाढलोय आणि त्याच विचारधारेवर काम करीत असल्याचा डांगोरा पिटणारे डॉ. पैठणकर यांचे हात याच गोवंशीय मटनाच्या मीठाने बरबटले आहेत का असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *