सह्याद्री IMPACT - गोवंश मांसाची चोरी भोवली! मनपातील चार कर्मचार्यांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल
News24सह्याद्री -
गोवंशाच्या हत्येवर आणि त्याच्या मांसावर पूर्णत: बंदी आहे. मात्र, तरीही नगरमध्ये गोवंशाची हत्या आणि मांसाची वाहतूक होते. नगरमध्ये हा प्रकार पोलिसांनी अनेकदा हाणून पाडला असला तरी हे प्रकार होत आहेतच! गोवंशीय मांस तयार करणार्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी चार दिवसांपूर्वी छापा टाकला आणि जवळपास दोन लाख रुपये किमतीचे गोवंशाचे मांस जप्त केले. जप्त केलेले हे मांस महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताब्यात दिले गेले. या विभागाने या मांसाची विल्हेवाट लावायची असते. मात्र, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्यांना हाताशी धरून गोवंशाची हत्या करणार्यांनी जप्त केलेले हे मांस पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा मुळ मालकांच्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
याबाबतचा व्हीडीओ प्रसारीत केला असून, महापालिकेचे या विभागाशी संबंधीत असणारे डॉ. पैठणकर यांचा व त्यांच्या सहकार्यांचा यात थेट संबंध असल्याचा संशय आता नगरकरांना येऊ लागला आहे. या प्रकरणात दोषी असणारे मनपाचे कर्मचारी आणि गोवंश हत्या करणारे अशा नऊ जणांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला! मात्र, असे असले तरी मनपाचा हा ठेका चालविण्यास घेणारा ठेकेदार सुटला कसा हा प्रश्न कायम आहे.
No comments
Post a Comment