Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री इम्पॅक्ट - असंगाशी संग भोवला : अकोल्याचे इन्सपेक्टर कंट्रोलला तर कॉंन्सटेबल केकान निलंबीत

No comments

  News24सह्याद्री -


‘गोमांस आणि वाळू वाहतुकीत हप्तेखोरी उघड करणारा दुसरा ऑडीओ बॉंब’ १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आणला. याबाबतचे सविस्तर वृत्त आम्ही प्रसारीत केल्यानंतर त्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आणि वस्तुस्थिती समोर आली. अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो सोडला गेल्याचे आणि वाळू तस्करांशी संबंध असल्याचेस्टींग ऑपरेशनमधून उघड झाले.

ही क्लीप आम्ही उघडकीस आणली आणि यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी लागलीच आदेश काढला. अकोले पोलीस ठाण्यात वारंवार चर्चेत आणि वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांची अकोल्यातील कारकिर्द अवघी १४ महिन्यांची ठरली. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात  काम केलेले परंतू सध्या नियंत्रण कक्षात असणारे पोलीस निरीक्षक अभय परभार यांची अकोले पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जोंधळे यांच्या बदलीची पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. अवैध वाळु वाहतूक प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण बाबासाहेब केकान यांची व्हायरल क्लिप पोलिसांनी पडताळली. त्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे केकान याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी  पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांना दिले होते. त्यात तत्थ्य आढळून आल्यानंतर केकान यांना पाटील यांनी निलंबित केले आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *