Breaking News

1/breakingnews/recent

दिवाळी विशेष - वेड्या बहिणीची वेडी ही माया (भाऊबीज )

No comments

 News24सह्याद्री-




बहिणीची असते भावावर अतूट माया
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया
भावाची असते बहिणीला साथ
मदतीला देतो नेहमीच हात 
काय मागू मी मणी नाही खंत
भाऊबीजेला ओवाळीते मी खरी भाग्यवंत
असं सुरेल हे नातं नाही नात्याला ते मोल
एका आईच्या उदरी जन्मली रत्ना दोन अनमोल  

दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा महत्तम - मौलिक सण म्हणजे भाऊबीज होय. यास यमद्वितीयाही म्हणतात. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.बहीण भावाला आदराने, प्रेमाने ओवाळते. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी ती प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ 'श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।' असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण केले जाते . हा विधी पंचांगात असतो. याच दिवशी यमाला दीपदान केलं जात .

 यम ही मृत्यूची देवता आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व धनाचा अपव्यच होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगावयाचे की, 'हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत. जागरूक आहोत. त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करत आहोत. त्याचा स्वीकार कर. कारण तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहिती नाही.'या दिवशी बहीण भावाला औक्षण करते. भाऊ नसेल तर बहीण चंद्राला ओवाळते. बहीण-भावाच्या अमर प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा दिवाळीतील सवरेत्तम सण होय. बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा इतका मंगल दुसरा कोणता ही  सण नाही.  


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *