Breaking News

1/breakingnews/recent

उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेंचा - राशीन येथील जागृत देवस्थान असणाऱ्या जगदंबा मातेचा महिमा

No comments

   News24सह्याद्री -

                                                                जगदंबा देवीने म्हैसुराशी नऊ दिवस युद्ध करून त्याचा नवरात्रीत वध केला. त्यापैकी क्षेत्र राशीन हे यमाई देवीचे स्वयंभू स्थान आहे. कोणी रेणुका म्हणतात मात्र सरकारी दप्तरी जगदंबा देवी नाव प्रचलित आहे. तसंच मंदिरातील पश्चिमेकडील भिंतीवरील शिलालेखामध्ये ‘श्री यमाई नावाचा उल्लेख आहे.देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मूळ मंदिराच्या चारही बाजूंनी ओव-या आहेत. समोर दोन भव्य दीपमाळा आहेत. उजव्या हाताकडील दीपमाळ हलणारी आहे हे येथील खास विशेष आहे.देवीचे मंदिर पुरातन असून ओव-या आणि प्रवेशद्वार २०० ते २५० वर्षापूर्वी बांधले आहेत. पेशवाईतील प्रसिद्ध मुत्सद्दी जंतोजी माणकेश्वर यांनी पहिल्या ओव-या बांधल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. तसंच १६६० साली सुप्याचे गंधे कुलकर्णी यांनी ही ओव-या बांधल्याचा उल्लेख आहे.आकाप्पा भुजंगाप्पा जंगम यांनी १७०४-१० या काळात देवळाचे काम पूर्ण केले. मंदिराच्या आवारातून प्रदक्षिणेचा पूर्ण दगडी मार्ग आहे. रंगीबेरंगी रंगात रंगलेलं मंदिर विलोभनीय दिसतं.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *