सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरु होणार !

News24सह्याद्री - राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरु होणार !....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली.
यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. आजपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment