Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - बनावट डिझेल रॅकेट : रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल; कारवाईचीच लागली चौकशी

No comments

    News24सह्याद्री - 

                                                    


नगर शहरात बनावट डिझेल तयार करून विकले जात असल्याचे समोर आले आणि पोलिसांच्या पथकाने धाड त्यावर धाड टाकली. मात्र, धाड टाकल्यानंतरही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचा प्रकार न्यूज २४ सह्याद्रीने उघडकीस आणला आणि आमच्या वृत्ताची थेट पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दखल घेतली. पोलिसांच्या पथकाने केलेली ही कारवाई योग्य होती का आणि कायदेशिर होती काय, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना रात्री दिले. त्यानुसार डीवायएसपी मदने यांनी संबंधित पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.

 या संपूर्ण प्रकरणात न्यूज २४ सह्याद्रीने नेहमीप्रमाणेच जागल्याची भूमिका ठेवली आणि हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात न्यूज २४ सह्याद्रीने आवाज उठविला.... पोलिस अधीक्षकांनी त्याची दखल घेतली आणि मग मध्यरात्री अडीच वाजता भिंगार कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पुरवठा विभागाने हलगर्जी पणा केल्याचे लपून राहिले नाही. कँप पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला असून गौतम वसंत बेळगे या आरोपीस अटक केली. अटकेचे सोपस्कर झाले असले तरी या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या चौकशीचे आदेश निघाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *