Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - पावसाळी अधिवेशन ठळक घडामोडी

No comments

News24सह्याद्री  - पावसाळी अधिवेशन ठळक घडामोडी..पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्ये  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेलं यंदाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दोन दिवस म्हणजेच 7 आणि 8 सप्टेंबरला  चालणाऱ्या या अधिवेशनात कोव्हिड19 चे संकट लक्षात घेत प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले गेले आहे.

त्यामुळे विधिमंडळात ‘मास्कधारी’ सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बरसताना दिसतील.आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *