सह्याद्री ब्रेकिंग - नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसींपाठोपाठ प्रांताधिकारी, तहसीलदार निघाले पॉझीटीव्ह

News24सह्याद्री -
जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग कमी व्हायला तयार नाही आणि त्यातूनच दररोजचा पॉझिटीव्ह आकडा कालच थेट तेराशेच्या घरात पोहोचला असल्याचे समोर आले. असताना आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातच कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवासी उपजिल्हाधिकार्यांसह, प्रांताधिकारी, पुरवठा आणि नियोजन भवनमध्ये काही अधिकारी व कर्मचारी पॉझीटीव्ह आले असतानाच आता श्रीगोंदा- पारनेरचे प्रांताधिकारीही पॉॅझिटीव्ह निघाले आहेत. याशिवाय पुनर्वसन विभागाचे तहसीलदार आणि सर्वसाधारण शाखेच्या नायब तहसीलदारही पॉझिटीव्ह निघाले आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या दालनातील शिपाईही पॉझिटीव्ह निघाले आहेत. नियोजन शाखेतील शिपाई देखील पॉझिटीव्ह निघाले आहेत. जिल्हाधिकार्यांच्या दालनात काम करणार्या दोघा शिपायांना कोरोना संसर्ग झाला असून दोघांचेही रिपोर्ट याआधीच पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानात शिपाई म्हणून काम करणारे अकील शेख यांचाही तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. कोरोना संसर्गावर उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
No comments
Post a Comment