"विठ्ठला संपूर्ण विश्वाला कोरोनमुक्त कर" मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे
सहपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल-रुक्मिणी महापूजा, बडे दाम्पत्याला महापूजेचा मान
News24सह्याद्री -
पंढरपूर ।
कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशात सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन वेळोवेळी उपाययोजना करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणारे सर्व सण सरकारने घरीच बसून साजरे करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा कोरोनाच्या महामारीमुळे थोड्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. पंढरपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने आषाढी यात्रेवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे आषाढीला भक्ताने दुमदुमणाऱ्या पंढरीमध्ये आज शुकशुकाट होता. त्यामुळे सर्व नियम बंधनांमध्ये बुधवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी, तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. विठ्ठल मंदिरात सहा वर्षे सेवा करणाऱ्या बडे दाम्पत्याला यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
”आपण सगळे जणं माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही ना कोणी अधिकारी. माऊलीच्या समोर सगळे सारखेच आहेत. मी मनापासून सांगतोय, हा मान मला मिळेल हा मी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता.मान जरूर मिळाला पण अशा परिस्थितीमध्ये पूजा करावी लागेल हा ही कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता. मी इथे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडं घालायला आलो आहे व साकडं घातलं आहे. मला नक्की विश्वास आहे, आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत, कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, आता मला त्या चमत्काराची परंपरा बघायची आहे”. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

No comments
Post a Comment