लालबागचा राजा मंडळाने घेतला "हा" महत्वपूर्ण निर्णय
News24सह्याद्री -
मुंबई । वृत्तसंस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सण घरीच साजरे करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केल आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या गणेशोत्सव देखील साधेपणाने करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. या निर्णयाचा मान राखत मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने गणेशोत्सवासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. “यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही,” त्याऐवजी रक्तदान शिबीर आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय लालबागचा राजा मंडळाने घेतला आहे. लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.
दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. आपल्यावर असणार कोरोनाच सावट लक्षात घेता तसेच दर्शनासाठी गर्दी होऊ नये या उद्देशाने मंडळाने हा निर्णय घेतला आहे. गणेशोस्तवाच्या काळात ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

No comments
Post a Comment