गरजुंना मोठा दिलासा; आणखी तीन महिने मिळणार ५ रुपयात शिवभोजनथाळी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
News24सह्याद्री -
मुंबई ।
कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले. त्याचा सगळ्यात मोठा फटका ज्यांचं हातावरच पोट आहे त्यांना बसला. त्यामुळे राज्यसरकारकडून गरजूना ५ रुपयात शिवभोजनथाळी देण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात आला. लॉकडाऊन संपला असलातरी कोणी उपाशी राहू नये यासाठी राज्यसरकारकडून आणखी तीन महिने ५ रुपयात शिवभोजनथाळी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भुकेलेल्या आणि गरजू व्यक्तींना दिलासा मिळणार असल्याचं माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटर वरून दिली.


No comments
Post a Comment