कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल
भारत- चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची लेहमधील भारतीय लष्कराला भेट
News24सह्याद्री -
नवी दिल्ली ।
सध्या सुरु असलेल्या भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता लेहला भेट दिली. त्यांच्यासोबत भारतीय संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे हे देखील उपस्थित होते. त्यांनी निमू येथे फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या
लष्करी अधिकाऱयांची भेट घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
पूर्व लडाखमधील खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर देशातून संताप व्यक्त केला जात आहे. चिनी माळावर बहिष्कार टाकावा यासाठी आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ अँपवर भारतात बंदी घातली आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर चांगलंच राजकारण पेटलं आहे. आरोप-प्रत्यारोप, बचावाचे सत्र सुरु आहे. या घटनेवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु झाले आहेत.

No comments
Post a Comment