Breaking News

1/breakingnews/recent

राज्यात लॉकडाउन कायम; ३१ जुलैपर्यंत निर्बंध लागू

No comments
News24सह्याद्री - 



मुंबई । 
३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. काल मुख्यमंत्र्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अर्थचक्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र अनलॉक करण्यात आला होता . ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निर्बंध संदर्भात निर्णय घेण्याची मुभा राज्यसरकारने दिली आहे. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त योग्य ती पाऊले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असेही राज्य सरकारने सांगितलेले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसेच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानगी सुद्धा त्यांना देण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *