Breaking News

1/breakingnews/recent

८० कोटी भारतीयांना नोव्हेंबर अखेरपर्यंत मिळणार मोफत धान्य देणार – पंतप्रधान

No comments
पंतप्रधानांची महत्वपूर्ण घोषणा

News24सह्याद्री - 

नवी दिल्ली । 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद सोडला. यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. ८० कोटी भारतीयांना नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मोफत धान्य दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मागील तीन महिन्यांपासून गरिबांना ज्याप्रकारे पाच किलो गहू किंवा तांदूळ, एक किलो डाळ आणि एक किलो चणे असं मोफत अन्नधान्य वाटप केलं जायचं.

त्याचप्रमाणे नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत आपण गरीबांना धान्य मोफत देणार आहोत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं आहे. नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्नधान्य यासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटीच्या घरात जाते. सर्व राज्यांना मी आवाहन करतो आहोत की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठीही त्यांनी सहकार्य करावं. याचा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगारासाठी आपलं गाव सोडून इतर राज्यांमध्ये जातात. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *