Breaking News

1/breakingnews/recent

भाजपने दिग्गजांसह नगरच्या शिंदे, कर्डिलेंना डावलले

No comments
भाजपची विधापरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर
News24सह्याद्री - 


अहमदनगर :
भाजप ने आज विधानपरिषदेच्या चार उमेदवारांची घोषणा केली. यात प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे व रणजितसिंह मोहिते पाटील या चौघांचा समावेश आहे. दरम्यान, जेष्ठ नेते एकनाथ खडसे,पंकजा मुंडे,विनोद तावडे,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नगरचे माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे व माजी मंत्री शिवाजी कर्डीले या दिग्गजांना भाजपने डावलले आहे. यातही खडसे व मुंडे यांची नावे आघाडीवर होती. या दोघांना विधानपरिषदेवर संधी मिळेल असा अंदाज खुद्द भाजपच्या वर्तुळातूनच वर्तविला जात होता.

मात्र पुन्हा एकदा पक्षांतर्गत गटबाजीने खडसे व मुंडे यांची संधी हुकली असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. याबरोबरच माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांच्याही मानसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. या दिग्गजांशिवाय नगर जिल्ह्यातून माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे विधानपरिषदेवर पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवली जात होती कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना शह देण्यासाठी भाजप त्यांना उमेदवारी दिल असा अंदाज होता. त्याबरोबरच राहुरी मतदार संघाचे माजी आमदार व मंत्री शिवाजी कर्डीले यांच्याहि नावाची चर्चा होती मात्र पक्षाने त्यांनाही डावलले आहे.No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *