Breaking News

1/breakingnews/recent

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेमधील मृत व्यक्तींच्या परिवाराला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

No comments
News24सह्याद्री - 

मुंबई : 
औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जालना वरून १९ मजूर हे आपल्या गावी जाण्यासाठी औरंगाबादकडे पायी निघाले होते. चालून थकल्याने ते रुळावरच झोपले. पण पहाटेच्या सुमारास बदनापूर- करमाड या मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ३ जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत त्यांनी मृत व्यक्तींच्या परिवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली. लवकरच केंद्रा सरकारशी बोलून परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची व्यवस्था करू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *