Breaking News

1/breakingnews/recent

गाजदीपूरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

No comments
पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

पारनेर । नगर सह्याद्री -
तालुक्यातील गाजदीपूर एका अल्पवयीन मुलीवर दैठणे गुंजाळ येथे मेंढ्या चारत असताना एका 56 वर्षीय व्यक्तिने जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानुसार पारनेर पोलिसांनी अनिल खंडु गुंजाळ (रा.दैठणे गुंजाळ ता.पारनेर) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, मागील वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही आपल्या आई-वडिलांसोबत या परिसरात वास्तव्यास असताना आरोपी अनिल खंडू गुंजाळ याने पीडित मुलीस एकांतात पाहून शेतात ओढून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरी संभोग केला. त्यातून पीडित मुलीस दिवस गेले.

याबाबत अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथून अहवाल प्राप्त झाल्यावर फिर्यादी मुलगी ही हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण म्हणून औषध उपचार घेत असताना तिने पोलिस उपनिरीक्षक बालाजी पद्मने, पोह भिंगारदिवे यांच्यासमक्ष दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी या पीडित मुलीची व कुटुंबीयांची भेट घेवुन माहिती घेतली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *