Breaking News

1/breakingnews/recent

'एप्रिल फुल' चे मेसेज पाठवत आहात... तर सावधान!

No comments
'एप्रिल फुल' चे मेसेज अथवा अफवांचे मेसेज पाठविणाऱ्यांवर कारवाई : गृहमंत्री अनिल देशमुख

 मुंबई | वृत्तसंस्था -
उद्या १ एप्रिल म्हणजेच ' एप्रिल फुल ' चा दिवस सगळे एप्रिल फूलच्या निमित्ताने सर्वाना मस्करीचे मेसेज एकमेकांना पाठवत असतात . पण उद्या(१ एप्रिल ) जर कोणी एप्रिल फुल अथवा अफवांचे मेसेज फॉरवर्ड केले तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत .
सर्व लोक सोशल मीडियाचा वापर करतात . त्यामुळे अनेक मेसेज फॉरवर्ड होत असतात . त्या मेसेजची शाहनिशा न करता ते पुढे पाठवले जातात पण आता महाराष्ट्र राज्याने याबद्दल निर्णय घेतला आहे . आता तुमच्या सोशल मीडिया वर क्राईम ब्रॅन्चची नजर असणार आहे त्यामुळे सावधान! .
कोणीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल आहे . सध्या देशावर कोरोनाच संकट घोंगावत आहे . त्याच पार्श्वभूमीवर कोणी चुकीचे मेसेज अथवा अफवा पसरविली तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *