Breaking News

1/breakingnews/recent

शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मिळणार ४० टक्के वेतन ; राज्यसरकारचा महत्वपूर्ण निर्णय

No comments
अ ,ब, क वर्गातील अधिकारी -कर्मचाऱ्यांचा वेतनात कपात , 'ड' वर्गातील कर्मचाऱयांच्या वेतनात कोणतीही कपात नाही .

मुंबई | वृत्तसंस्था -

जागतिक महामारीला रोखण्यासाठी देशात आणि राज्यात टाळेबंदी करण्यात आली खरी पण याचा सामान्य जनतेला मोठा प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नातही घट झालेली आहे . याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . या परिस्थितीवर मत करण्यासाठी सर्व शासकीय व लोकप्रतिनिधी यांच्या वेतनात ६० टक्के कपात करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला आहे .

यामध्ये ' अ ' आणि ' ब ' वर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा पगारात ५० टक्के कपात करण्यात आली आहे तर ' क ' वर्गातील कर्मचाऱ्यांची २५ टक्के पगार कपात होणार आहे व त्यांना ७५ टक्के वेतन देण्यात येणार आहे . तसेच ' ड ' वर्गातील कर्मचाऱयांच्या पगारात कोणतीच कपात होणार नाही . अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली . सर्व शासकीय कर्मचारी- अधिकारी यांचा संघटनांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *