Breaking News

1/breakingnews/recent

जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले 'ते' कोरोना संशयित रुग्ण पुन्हा निगराणीखाली

No comments

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती

अहमदनगर । न्यूज 24 सह्याद्री-  येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या चारजणांना वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र त्यातील तिघांनी सिव्हिलमधून शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पलायन केल्याची घटना घडली होती. दरम्यान जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या कोरोना संशयित तिघांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनास पत्र दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले 'ते' कोरोना संशयित रुग्ण स्वतः पुन्हा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

याबाबत सविस्तर असे की, जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. मागील आठवड्यात शहरातील काहीजण दुबई येथे सहलीसाठी गेले होते. त्यातील एकास या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. यादरम्यान या रुग्णाचा अन्य ज्यांच्याशी संपर्क झाला होता. त्यांचा शोध घेवून त्यांना सिव्हिलमध्ये वैद्यकिय पथकाच्या निगराणीखाली ठेवायात आले होते. परंतु शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्यासुमारास यातील तिघेजण पसार झाले. याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांनी तोफखाना पोलिसांना याबाबत पत्र दिले होते. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे दोन व तोफखाना पोलिसांचे एक असे तिन पथके या रुग्णांच्या शोधार्थ रवाना केली होती. रात्री उशीरा जिल्हा रुग्णालयातुन पळून गेलेले रुग्ण स्वतः उपचारासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *